पेंग्विनची देखभाल करणाऱ्या कंपनीवर पालिकेची कारवाई

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबई - राणीबागेतील पेंग्विन मृत्यू प्रकरणी अखेर पालिकेनं कंत्राटदाराविरोधात कारवाई केली आहे. पेंग्विनच्या देखभालीत हलगर्जीपणा केल्याचं म्हणत पेंग्विनची देखभाल करणाऱ्या स्कायवे कंपनीची 1 कोटी 40 लाखांची बँक गॅरंन्टी जप्त करण्यात आलीय.

राणीबागेतील एका पेंग्विनचा जिवाणूंची संसर्ग झाल्यानं 23 ऑक्टोबरला मृत्यू झाला होता. पेंग्विनच्या मृत्यूनंतर यावरून बरेच राजकारण रंगले. बुधवारी झालेल्या स्थायी समितीतही याचे पडसाद उमटले. पेंग्विनच्या मृत्यूला प्रशासन आणि कंत्राटदारच जबाबदार असल्याचं म्हणत सपाचे रईस शेख यांनी हरकतीचा मुद्दा उचलला होता. तसंच त्यांनी कंत्राटदाराविरोधात कारवाई करण्याचीही मागणी केली होती. त्यानुसार पालिकेकडून कंत्राटदाराची बँक गॅरंन्टी जप्त करण्यात आलीय.

पुढील बातमी
इतर बातम्या