शासकीय कार्यालयांमुळे मुंबई महापालिकेला फटका

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबई (mumbai) शहरातील राज्य सरकारच्या विविध शासकीय कार्यालयाने मुंबई महापालिका (brihanmumbai municipal corporation) प्रशासनाचा सुमारे 1800 कोटी 33 लाख रुपयांचा मालमत्ता कर थकविला आहे.

यामुळे महापालिकेच्या (bmc) महसुलांवर परिणाम होत आहे. तसेच तो भरण्याकडे सरकारी यंत्रणा दुर्लक्ष करत असल्याचे पालिका सूत्रांनी सांगितले.

जकात बंद झाल्यावर मुंबई महापालिकेच्या (brihanmumbai municipal corporatuo महसुलाचा मुख्य स्रोत मालमत्ता कर राहिला आहे. परंतु अनेक शासकीय यंत्रणा हा कर भरण्यासाठी उदासीनता दाखवत आहेत.

नुकतीच करनिर्धारण विभागाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार एमएमआरडीएने (MMRDA) 929 कोटी 79 लाख 76 हजार 852 रुपये, म्हाडा प्रशासनाने 368 कोटी 55 लाख 89 हजार 967 रुपये, मुंबई पोलीस विभाग 71 कोटी 43 लाख 42 हजार 662 रुपये, राज्य सरकारी कार्यालये 221 कोटी 85 लाख 78 हजार 017 रुपये, तर केंद्र सरकारची कार्यालये 208 कोटी 68 लाख 76 हजार 602 रुपये अशाप्रकारे या सर्व शासकीय कार्यालयांनी महापालिका मालमत्ता कर (property tax) थकविलेला आहे.

या थकबाकीमुळे मुंबई महापालिकेचे हजारो कोटींचे नुकसान होत आहे.


हेही वाचा

पाणीटंचाई, गळती टाळण्यासाठी पाणी मीटर बसवण्याची योजना

मुंबईत टोमॅटोच्या दरात वाढ

पुढील बातमी
इतर बातम्या