केईएम रुग्णालयात पंजाब नॅशनल बँक आणि टपाल खात्याची सेवा

  • भारती बारस्कर & मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

परळ - 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बदलून देण्यासाठी पंजाब नॅशनल बँक आणि भारतीय टपाल खाते यांनी परळच्या केईएम रुग्णालयात विशेष सेवा उपलब्ध करून दिली आहे. त्याचा लाभ या रुग्णालयातील रुग्ण, त्यांचे नातेवाईक आणि संबंधित कर्मचाऱ्यांनाही होणार आहे. महापालिकेच्या इतर रुग्णालयांतही बँक आणि टपाल खात्यानं मागितल्यास ही विशेष सेवा सुरू करण्यासाठी पालिका प्रशासन जागा उपलब्ध करून देईल.

केईएम रुग्णालयाच्या गेट क्रमांक २ येथे पंजाब नॅशनल बँकेच्या दादर शाखेनं तर कामगार वाचनालयाजवळील उपहारगृहालगत भारतीय टपाल खात्याच्या दादर कार्यालयानं कक्ष सुरू केला असून ही सेवा १५ नोव्हेंबरपासून सुरू होतेय. या कक्षासाठी पालिकेने विनामूल्य जागा दिली आहे. या रुग्णालयात येणारे रुग्ण, त्यांचे नातेवाईक आणि रुग्णालयाचे कर्मचारी यांना प्राधान्यानं जुन्या चलनी नोटा बदलून दिल्या जातील. त्यासाठी बँकेत करावी लागेल, तशीच कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल.

पुढील बातमी
इतर बातम्या