दुसऱ्या दिवशीही पालिकेची कारवाई

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

देवनार - वाहतुकीला अडथळा ठरत असलेल्या बांधकामावर पालिकेच्या एम पूर्व विभागाने तोडक कारवाई सुरू केली आहे. त्यानुसार गुरुवारी पनवेल-सायन मार्गावरील निवासी आणि अनिवासी बांधकामांवर पालिकेनं हातोडा चालवला. शुक्रवारी देखील पालिकेने ही तोडक कारवाई पुढे सुरू ठेवत 2 निवासी आणि 6 अनिवासी गाळे जमिनदोस्त केले. या कारवाईसाठी पालिकेचे 36 कामगार आणि 37 पोलीस याठिकाणी कार्यरत असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त श्रीनिवास किळजे यांनी दिली.

पुढील बातमी
इतर बातम्या