फायर बाईकसाठी पालिकेची निविदा, निमुळत्या जागेसाठी सोईस्कर

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC)नं या महिन्यात निविदा नोटीस अधिकृत केली आहे. त्यामध्ये ४० लिटर पाणी आणि अग्निशामक साधने वाहून नेणाऱ्या ५ अग्निशामक बाईक मिळवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

सन २०१६ च्या काळबादेवीच्या आगीनंतर, पालिकेनं फायर बाईकची संकल्पना सुरू केली होती. जेणेकरून कमी वेळेत गर्दीची ठिकाणं किंवा निमुळत्या गल्लीतून देखील जाणं सोपे होईल.

शिवाय, २०१६ मध्ये अग्निशमन विभागानंदेखील भायखळा कमांड सेंटरवर अशाच एका सुधारित बाईकचे प्रात्यक्षिक प्रदर्शन केलं होतं. जिथं रॉयल एनफील्ड हिमालयन 410 सीसी दुचाकी अग्निशमन वाहनात सुधारित करण्यात आली होती.

अहवालानुसार, मुंबई फायर ब्रिगेडनं (MFB) गेल्या वर्षी स्थायी समितीसमोर याबाबत प्रस्ताव ठेवला होता. परंतु, एकच निविदाकारानं इंन्ट्रेस्ट दाखवल्यामुळे हा प्रस्ताव परत पाठवण्यात आला. यानंतर या महिन्याच्या सुरुवातीला एमएफबीनं पुन्हा निविदा उघडल्या.

यापूर्वी निविदेस मिळालेला प्रतिसाद कमी असल्यानं, महानगरपालिकेनं चाचणीच्या आधारे पाच दुचाकींसाठी निविदा उघडल्या आहेत. जर त्याला पुरेसा प्रतिसाद मिळाला तर प्रशासकीय वॉर्डांपैकी प्रत्येकासाठी एक २४ दुचाकी खरेदी केल्या जातील.

दरम्यान, यापूर्वी २७ डिसेंबर रोजी मुंबईच्या कांदिवली इथल्या मंदिरात भीषण आगीत ३ लोकांचा मृत्यू झाला होता. प्राथमिक माहितीनुसार, ही घटना चारकोप परिसरातील बंदर पाखाडी रोड इथल्या साई बाबा मंदिरात घडली.


हेही वाचा

पुढील बातमी
इतर बातम्या