बृहन्मुंबई (mumbai) महानगरपालिकेने (bmc) आपल्या 'MCGM सेंटर फॉर म्युनिसिपल कपॅसिटी बिल्डिंग अँड रिसर्च' (MCMCR) अंतर्गत, असोसिएट फॅकल्टी, उप/सहाय्यक देखभाल अभियंता (Maintenance Engineer) आणि कार्यालयीन सहाय्यक यांसारख्या विविध कंत्राटी पदांसाठी (posts) भरती जाहीर केली आहे.
ही भरती MCMCR अंतर्गत असलेल्या विविध तांत्रिक आणि प्रशासकीय केंद्रांसाठी केली जात आहे.
निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती तीन वर्षांच्या कंत्राटी कालावधीसाठी केली जाईल. उमेदवाराची कामगिरी समाधानकारक असल्यास हा कालावधी वाढवला जाऊ शकतो.
अधिसूचनेनुसार, इच्छुक उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात. पदाच्या स्वरूपानुसार, अर्ज करण्याची अंतिम तारीख काही पदांसाठी 5 मे, तर इतरांसाठी 11 मे अशी निश्चित करण्यात आली आहे.
MCMCR ही BMC च्या अधिपत्याखालील एक राज्यस्तरीय प्रशिक्षण आणि संशोधन संस्था आहे.
क्षमता बांधणी (Capacity Building) आणि शहरी प्रशिक्षण कार्यक्रमांसाठी 'नोडल एजन्सी' म्हणून महाराष्ट्र शासनाने या संस्थेला अधिकृत मान्यता दिली आहे.
अर्ज सादर करण्यापूर्वी, उमेदवारांनी पात्रता निकष, शैक्षणिक अर्हता आणि सविस्तर सूचना MCMCR च्या अधिकृत संकेतस्थळावर तपासून पहाव्यात, असा सल्ला देण्यात येत आहे.
हेही वाचा