कामाला फाटा, ऑफिसात सन्नाटा

  • मंगल हनवते & मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबई - खड्डे आणि साथीच्या रोगांचं आव्हान महापालिकेसमोर असताना ऑन ड्युटी क्रिकेट खेळणारे पालिकेच्या जी नार्थ विभागाचे कर्मचारी आणि अधिकारी यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. पालिका अधिकारी ऑन ड्युटी क्रिकेट खेळत असल्यानं पूर्ण ऑफिस मात्र सामसूम होतं. त्यामुळे या प्रकरणाची महापालिका आयुक्त अजॉय मेहता यांनी गंभीर दखल घेतली आहे. चौकशी करून यासंबंधीचा अहवाल तातडीनं सादर करण्याचे आदेशच उपायुक्त आनंद वागराळकर यांना आयुक्तांनी दिले आहेत.

क्रिकेटप्रकरणात देशपांडेंचीही उडी

'खड्ड्यात उभं केलं म्हणून अभियंत्यांना लाज वाटली आणि 4 हजार अभियंत्यांनी मुंबईकरांना वेठीस धरण्याचा प्रयत्न केला. आता ऑन ड्युटी क्रिकेट खेळताना महापालिका अधिकाऱ्यांना लाज वाटत नाही का?' असा सवाल करत मनसेचे पालिका गटनेते संदीप देशपांडे यांनीही क्रिकेट प्रकरणात उडी घेतली आहे. तर दुसरीकडे जी नॉर्थ प्रभाग समिती अध्यक्षांची परवानगीही या अधिकाऱ्यांनी घेतली नसल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे प्रभाग समिती अध्यक्ष सुधीर जाधव यांनी अभियंत्यासाठी रस्त्यावर उतरणाऱ्या संघटना आता कोणतीही परवानगी न घेता क्रिकेट खेळणाऱ्या अधिकाऱ्यांची कशी आणि काय बाजू घेणार, असा सवाल करत संघटनांनाही कोंडीत पकडलं आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या