अनधिकृत बांधकामावर पालिकेचा हतोडा

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

सायन जोगळेकरवाडी येथील पटेल चाळ आणि किशोर भाई चाळ येथे अनधिकृतरीत्या बांधण्यात आलेल्या घरांवर पालिकेने कारवाई केली. ही सर्व घरे अनधिकृतरीत्या बांधण्यात आली होती. 

पालिकेने नोटीस बजावूनही घर खाली न केल्याने शुक्रवारी पालिकेने कारवाई केली. एफ उत्तर वॉर्डचे सहाय्यक आयुक्त केशव उबाळे यांच्या मार्गदर्शना खाली ही कारवाई करण्यात आली. 

मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामावर हातोडा चालवण्यासाठी मुंबई महानगपालिकेने धडक मोर्चा काढला आहे. या अंतर्गत संपूर्ण मुंबईभरात प्रत्येक वॉर्ड मधील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात येत आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या