अखेर पालिकेला आली जाग

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबई - निवडणूक जवळ आली तशी पालिकेला जाग आलीय. पालिका क्षेत्रातील तब्बल 305 रस्त्यांच्या दुरुस्तीच्या कामाला सुरूवात झाल्याची माहिती पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी दिलीय. बुधवारी आयुक्तांनी या कामाचा आढावा घेत, कामादरम्यान अचानक संबंधित परिमंडळीय उपायुक्तांनी कामाच्या ठिकाणाला भेटी देत कामाची पाहणी करावी तसेच कामाची गुणवत्ता तपासत काही उणीवा आढळल्यास त्वरीत आवश्यक ती कार्यवाही करावी, असे आदेशही या आढावा बैठकीत देण्यात आले. शहर विभागातील 83 रस्त्यांचे काम सुरू झाले असून, यात बँरिस्टर नाथ पै मार्ग, डाँ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, जी.डी. आंबेडकर मार्ग, रजनी पटेल चौक, न. चि. केळकर मार्ग, प्रबोधन ठाकरे मार्ग, सिद्धीविनायक चौक आदी रस्त्यांचा समावेश आहे. तर पूर्व उपनगरात 88 रस्त्यांचे काम सुरू असून, यात कोहिनूर रूग्णालय, लल्लूभाई कंपाऊंड मार्ग, घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडचा समावेश आहे. पश्चिम उपनगरातील 134 रस्त्यांचे काम सुरू आहे. त्यात स्वामी विवेकानंद मार्ग, ना.सी. फडके मार्ग, श्रद्धानंद मार्ग आणि वीरा देसाई मार्ग येथील रस्त्यांचा यात समावेश आहे. या पार्श्वभूमीवर आता मुंबईतील 305 रस्ते चकाचक आणि गुळगुळीत होणार आहेत.

पुढील बातमी
इतर बातम्या