धारावीत सफाई कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईतील वरळी कोळीवाड्यानंतर आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीतही करोनाचा रुग्ण आढळला आहे. त्याचप्रमाणे धारावीत करोनाचा दुसरा रुग्ण आढळला असून सॅनिटाइझचं काम करणाऱ्या एका सफाई कर्मचाऱ्याला करोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळ धारावीसह मुंबईत भीतीच वातावरण निर्माण झालं आहे.

बुधवारी धारावीत ५२ वर्षीय व्यक्तीचा करोनामुळं मृत्यू झाला होता. त्यामुळं हा व्यक्ती राहतो तो परिसर पूर्णपणे सील करण्यात आला. तसंच या व्यक्तीच्या कुटुंबीयांची, त्यांच्या शेजाऱ्यांची आणि त्याच्या संपर्कात आलेल्या लोकांची तपासणी करण्यात येत असून त्यांना घरातच क्वॉरंटाइन करण्यात आलं.

प्रशासनाकडून धारावीत करोनाचा फैलाव होऊ नये म्हणून युद्धपातळीवर नियोजन सुरू असतानाच धारावीत करोनाचा आणखी एक रुग्ण आढळला आहे. हा ५२ वर्षीय सफाई कर्मचारी वरळीतील रहिवासी असून हा कर्मचारी धारावीत सॅनिटाइझिंगचं काम करत असल्याची माहिती मिळते.

पुढील बातमी
इतर बातम्या