महापालिका शाळांतील साऊंड सिस्टीम सुधारणार

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

महापालिकेच्या शाळांमधील नादुरुस्त साऊंड सिस्टीम सुधारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यामुळे आता महापालिकेच्या शाळांमध्ये आवश्यक तिथे साऊंड सिस्टीम बसवण्यात येणार आहे. यासाठी १४ कोटी रुपये रुपये खर्च करण्यात येणार आहे. परंतु ही सिस्टीम किती शाळांमध्ये बसवण्यात येईल, हे मात्र अजून नक्की नाही.

साऊंड सिस्टीम कशासाठी?

महापालिकेच्या अनेक शाळांमध्ये प्रार्थना करण्यासाठी तसेच कार्यक्रम, समारंभासाठी आवश्यक साऊंड सिस्टीम कार्यरत नाही. महापालिकेच्या एकूण १२३१ शाळा असून या सर्व शाळांमध्ये सुमारे पावणेचार लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सोईसाठी शहर, पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगरांतील शाळांमध्ये स्वतंत्र कंत्राटदार नेमून साऊड सिस्टीम बसवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

किती खर्च?

यासाठी प्रत्येक विभागांसाठी प्रत्येकी ४ ते ४.५० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. त्यामुळे स्थायी समितीच्या मान्यतेनंतर येत्या ६ महिन्यांमध्ये ही सर्व यंत्रणा बसवली जाणार असल्याचंही शिक्षण विभागाने स्पष्ट केलं.

पुढील बातमी
इतर बातम्या