वर्षभरात अवघा 20 टक्के निधी खर्च

  • शेखर साळवे & मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबई - महापालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष सज्ज झाले असून, सत्ताधाऱ्यांकडून विकास कामांचं उद्घाटन आणि भूमिपूजनाचा धडका सुरू झालाय. मात्र प्रत्यक्षात महापालिकेच्या अर्थसंकल्पापैकी अवघा 20 टक्के निधीच खर्च झाल्याची बाब उघडकीस आलीय. अवघ्या काही दिवसांत आचारसंहिता लागू होणार असल्यानं कोट्यवधी रुपयांचं बजेट पडून राहणार असल्याचं स्पष्ट झालंय. महापालिकेने 2016- 17 या आर्थिक वर्षाचे 37 हजार कोटी रुपयाचं बजेट मंजूर केलं. मात्र डिसेंबर 2016 पर्यंत प्रत्येक खात्याचा निधी फक्त 20 टक्केच वापरला गेलाय.

कसा खर्च झाला निधी

- रस्ते विभागासाठी 3,886.02 कोटींची तरतूद, खर्च - 80 कोटी - 2.7 टक्के काम

- आरोग्य विभागासाठी 904.64 कोटींची तरतूद, खर्च - 159.55 कोटी, फक्त 17.64 टक्के काम

- शिक्षण विभागासाठी 324.57 कोटींची तरतूद, खर्च - 58.82 कोटी, 18.12 टक्के काम

- जल विभाग आणि मलनिसारणासाठी 2575.31 कोटींची तरतूद, 475.30 कोटी खर्च, 18.46 टक्के काम

- अग्निशमन दलासाठी 323 कोटींची तरतूद, 67.47 कोटी खर्च, 20.84 टक्के काम

- आयटी विभागासाठी 134.82 कोटींची तरतूद, 58.73 कोटी खर्च, 43.56 टक्के काम

- घनकचरा 234.89 कोटी 46.38 कोटी खर्च, 19.74 टक्के काम

- उद्यानासाठी 383.82 कोटींची तरतूद 96.56 कोटी खर्च, 25.16 टक्के काम

- देवनार 54.81 कोटींची तरतूद 1.25 कोटी खर्च, 2.28 टक्के काम

- मार्केटसाठी 74.58 कोटी तरतूद 13.42 कोटी खर्च, 17.99 टक्के काम

पुढील बातमी
इतर बातम्या