पदविधारकही होऊ शकणार जलअभियांत्रिकी सल्लागार

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबई - मुंबई महानगर पालिकेच्या जलअभियंता खात्यात जलअभियांत्रिकी सल्लागार म्हणून काम करण्याची संधी आता पदविधारकांनाही उपलब्ध होणार आहे. जलअभियंता खात्यातील नळजोडणी कारागिरांना त्यांच्या शैक्षणिक पात्रता आणि अनुभवाच्या आधारे जलअभियांत्रिकी खात्याकडे जलअभियांत्रिकी सल्लागार म्हणून नोंदणी करता येते. आता मात्र पालिकेनं शैक्षणिक पात्रतेच्या अटी शिथिल केल्या आहेत. त्यामुळे स्थापत्य अभियांत्रिकी या विषयातील पदविधारकांनाही जलआभियांत्रिकी सल्लागार म्हणून नोंदणी करता येईल. 'इझ ऑफ डुइंग' बिझनेसअंतर्गत पालिकेकडून उद्योजकांना प्रोत्साहन देत उद्योग वाढवण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पालिकेचे उपायुक्त (विशेष आभियांत्रिकी) रमेश बांबळे यांनी दिली आहे. तर या निर्णयामुळे सल्लागारांची संख्या वाढेल, स्पर्धा वाढेल आणि त्यातून चांगले काम होईल, असा विश्वासही बांबळे यांनी व्यक्त केला आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या