नाहूरमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे एक्झॉटिक बर्ड पार्क उभारण्यात येणार

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) पूर्व उपनगरातील नाहूर येथे अत्याधुनिक, आंतरराष्ट्रीय दर्जाचे एक्झॉटिक बर्ड पार्क विकसित करणार असल्याची माहिती बीएमसीने दिली आहे.

या प्रकल्पाचे भूमिपूजन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी सायंकाळी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे करण्यात आले. याच कार्यक्रमात मुलुंड येथील बीएमसीद्वारे चालवण्यात येणाऱ्या रुग्णालयाच्या नव्या इमारतीचे उद्घाटनही करण्यात येणार आले.

बीएमसीच्या माहितीनुसार, या एक्झॉटिक बर्ड पार्कमध्ये पक्ष्यांच्या नैसर्गिक अधिवासाची अनुभूती देणारी 24 स्वतंत्र अधिवास क्षेत्रे म्हणजेच हॅबिटॅट्स असतील. येथे ऑस्ट्रेलिया, आफ्रिका आणि अमेरिकेतील दुर्मिळ आणि रंगीबेरंगी पक्षी ठेवण्यात येणार आहेत. त्यात मॅकॉ, कॉकाटू, टूकॅन, तीतर (फिझंट) आणि शहामृग (ऑस्ट्रिच) यांचा समावेश असेल.

पक्षी उद्यान बीएमसीच्या मालकीच्या १७,१३९.६४ चौरस मीटर क्षेत्रफळाच्या भूखंडावर उभारण्यात येणार आहे. यापैकी 10,859 चौरस मीटर क्षेत्रफळ खास एक्झॉटिक पक्ष्यांसाठीच्या एव्हिएरीजसाठी राखीव असेल. उर्वरित भागात तिकीट काउंटर, सार्वजनिक स्वच्छतागृहे, कॅफे तसेच भूमिगत पार्किंगसारख्या पर्यटकांसाठीच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील.

या प्रकल्पात स्वतंत्र पशुवैद्यकीय सुविधा, क्वारंटाईन क्षेत्रं आणि पक्ष्यांसाठी खास स्वयंपाकगृहे (बर्ड किचन) यांचाही समावेश असेल.

दरम्यान, बीएमसीने मुलुंड (पश्चिम) येथील कदमपाडा परिसरात श्रीमती माणसादेवी तुळसीराम अग्रवाल सर्वसाधारण रुग्णालयाची नवी इमारतही उभारली आहे. ही इमारत 9,712 चौरस मीटर भूखंडावर बांधण्यात आली आहे. 10 मजली या इमारतीचे एकूण बांधकाम क्षेत्र 59,045 चौरस मीटर आहे. या नव्या इमारतीमुळे रुग्णालयाची एकूण क्षमता 470 खाटांपर्यंत वाढणार आहे.

यापैकी 310 खाटा सर्वसाधारण उपचारांसाठी तर 160 खाटा सुपर-स्पेशालिटी उपचारांसाठी असतील. या सुविधा टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात 110 खाटा आणि मूलभूत वैद्यकीय सेवा सुरू होतील. त्यानंतर हृदयरोग, मूत्रपिंड विकार (नेफ्रोलॉजी) तसेच प्रगत निदान सुविधा यांसारख्या विशेष आणि अतिविशेष उपचार सेवा हळूहळू सुरू करण्यात येणार असल्याचे बीएमसीने सांगितले आहे.


पुढील बातमी
इतर बातम्या