मुंबई महापालिकेकडून सर्वसामान्यांसाठी स्वस्त घरे

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबई महानगरपालिकेकडून (brihanmumbai municipal corporation) आता म्हाडाच्या धर्तीवर 20 टक्क्यांच्या बदल्यात विकासकांकडून उपलब्ध झालेल्या घरांची विक्री करण्यात येणार आहे.          

अशी 426 घरे महापालिकेला (bmc) मिळालेली आहे. त्यांची दिवाळीनंतर प्रथमच म्हाडाप्रमाणे (mhada) लॉटरीद्वारे विक्री केली जाणार आहे. महापालिका पुढील आठवड्यापासून मुंबईकरांकडून अर्ज स्वीकारणार आहे.                                                                               

किमान 270 चौरस फूट ते कमाल 528 चौरस फूट आकाराची ही घरे असणार आहेत. यामुळे मुंबईकरांना महापालिकेकडून उपलब्ध होणाऱ्या घरांमध्येही गुंतवणूक करता येणार आहे.

या घरांच्या विक्रीतून महापालिकेला तब्बल 300 कोटी रुपयांपेक्षा अधिक महसूल मिळणार असल्याची माहिती महापालिकेतील सूत्रांनी दिली. मुंबई महापालिका आता विकासकांच्या मदतीने सर्वसामान्यांसाठी परवडणारी घरे उपलब्ध करून देईल.

विकास नियंत्रण नियमावलीत केलेल्या बदलांमुळे, आता चार हजार चौरस मीटरपेक्षा मोठ्या भूखंडांवर बांधकाम करताना विकासकांना महापालिकेसाठी 20  टक्के घरे अल्प व अत्यल्प उत्पन्न गटासाठी बांधावी लागतील.

या नियमांनुसार महापालिकेला शहरात तब्बल 426 घरे मिळाली आहेत. ही घरे सोडतीद्वारे विकण्यात येतील आणि मुंबईत (mumbai) आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकांना हक्काचं घर मिळावं हा यामागील मुख्य उद्देश आहे.

पुढील सात दिवसांत या घरांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे. जाहिरात व महापालिकेच्या संकेतस्थळावरही याची माहिती दिली जाईल.

यापूर्वी विकासकांकडून मिळणाऱ्या प्रीमियमच्या (premium) बदल्यात घरे मिळवण्याची सोय होती. परंतु, आता नियमांमध्ये बदल करून विकासकांना थेट घरे बांधून देण्यास सांगिण्यात आले आहे.

नियम 15 नुसार, मोठ्या भूखंडांवर बांधकाम करणाऱ्या विकासकांना 20 टक्के घरे महापालिकेला राखीव ठेवावी लागतात. यातूनच महापालिकेला ही 426 घरे मिळाली आहे.

या घरांचा आकार 270 चौरस फुटांपासून ते 528 चौरस फुटांपर्यंत आहे. या घरांची किंमत 60 लाख रुपयांपासून ते 1 कोटी रुपयांपर्यंत असू शकते.


हेही वाचा

बोईसर रेल्वे स्टेशनजवळ अंडरपास बांधकामासाठी प्रस्ताव

पूरग्रस्त भागातील महिलांना मोफत सॅनिटरी पॅड वाटप

पुढील बातमी
इतर बातम्या