वडाळ्यात 76 अनधिकृत घरं भुईसपाट

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

अनधिकृत बांधकामप्रकरणी पालिकेने वडाळा (प) येथील जय शिवाजीनगर परिसरातील वस्त्यांवर तोडक कारवाई केली. गेल्या 40 वर्षांपासून राहत असलेल्या या अनधिकृत वस्त्यांवर पालिकेने सोमवारी हातोडा चालवला. एकूण 76 अनधिकृत घरे या कारवाईत भुईसपाट करण्यात आली. 

येथील कायदेशीररीत्या पात्र ठरलेल्या राहिवाशांचे माहुल या ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे. या आधीही कायदेशीररीत्या पात्र ठरलेल्या रहिवाशांना तिथे पाठवण्यात आले आहे. उर्वरित कुटुंबियांना कारवाईनंतर योग्य कागदपत्रांसह तेथे पाठवण्यात येणार आहे. पालिकेने दिलेल्या नोटिशीप्रमाणे, सोमवारी येथे कारवाई करण्यात आली. इथल्या राहिवाशांची सोय त्यांच्या कुटुंबियांसह माहुल येथे करण्यात आली असल्याचे एफ/उत्तर पालिका परिरक्षण आणि दुरुस्ती विभागाचे अभियंता राजेश मेराई यांच्याकडून सांगण्यात आले.

या रहिवाशांना माहुल येथे म्हाडातर्फे राहण्यासाठी घरे तर देण्यात आली. मात्र त्या ठिकाणी योग्य त्या सोयीसुविधा नसल्याची या रहिवाशांची तक्रार आहे. पाणी, वीज आणि शौचालयाच्या अपुऱ्या सोयी-सुविधांमुळे आम्ही त्रस्त झाल्याचं या रहिवाशांनी 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना सांगितलं.

पुढील बातमी
इतर बातम्या