महापालिकेचं 'इतक्या' कोटींचं पाणी बिल मध्य-पश्चिम रेल्वेनं थकवलं

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मध्य व पश्चिम रेल्वेनं महापालिकांचं ५२७ कोटी रुपयांचं पाण्याचं बिलं मागील ३ वर्षांपासून थकवलं आहे. याबाबत आरटीआय कार्यकर्ते समीर झवेरी यांनी पालिकेकडून पाण्याच्या थकबाकीदारांच्या मागावलेल्या माहितीतून ही बाब उघडकीस आली आहे. २०१७ पासून मध्य रेल्वेचे २३८ कोटी रुपये आणि पश्चिम रेल्वेकडे २८९ असे एकूण ५२७ कोटी रुपयांचं पाण्याची थकबाकी रक्कम आहे. 

महापालिकांडून कायदेशीर नोटीस बजावण्यात आली होती. मात्र त्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आलेली नाही. तसेच पाण्याची थकबाकी रक्कम वसूल करण्यासाठी पालिका प्रशासनाकडून प्रयत्न सुध्दा करण्यात आले नाही. मात्र सामान्य मुंबईकराने जर २ ते ३ महिन्यात जास्त पाण्याची थकबाकी ठेवली तर पालिका आपली जलजोडणी खंडित करते. मात्र, रेल्वेला महापालिकेनं दिलासा दिला आहे.

मध्य-पश्चिम रेल्वे प्रशासनानं महापालिकांचे ५२७ कोटी रुपयांचं पाण्याचं बिलं गेल्या ३ वर्षांपासून थकवले आहे. महापालिका प्रशासनांकडून रेल्वे प्रशासनाला नोटीस बजावून रेल्वेवर कारवाई करण्यात आलेली नाही. महापालिकाकडून गेल्या ३ वर्षांपासून रेल्वेचं पाण्याचं थकीत बील का वसूल करण्यात आलेली नाही. त्यांच्यावर कायदेशीर नोटीस बजावून सुध्दा कारवाई करण्याऐवजी त्यांना पाणी पुरवठा केला जात आहे, हे निराशाजनक असून सामान्य मुंबईकराने जर दोन महिन्यात जास्त पाण्याची थकबाकी ठेवली तर पालिका आपली जलजोडणी खंडित करते. त्यामुळे पालिका प्रशासनाने रेल्वेवर कायदेशीर कारवाई केली पाहिजे, अशी प्रतिक्रिया आरटीआय कार्यकर्ते समीर झवेरी यांनी दिली.

पुढील बातमी
इतर बातम्या