मुंबईत पाच मजली मासळी बाजार उभारण्यात येणार

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईत लवकरच पाच मजली मासळी बाजार उभारण्यात येणार आहे. स्थानिक संस्कृती आणि अत्याधुनिक सोयी सुविधांनी सुसज्ज असा हा आंतरराष्ट्रीय मासळी बाजार उभारण्यात येणार आहे.

अंधेरीच्या जे.बी. नगर येथे पाच मजल्यांचा हा बाजार उभारण्यात येणार असून त्यासाठी 138 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या बाजाराच आराखडा ठरवण्यात आला असून त्याच्या मंजुरीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. 

स्थानिक मासळी बाजारांची स्थिती सुधारण्याबरोबरच मच्छिमारांसह विक्रेत्यांनाही दर्जेदार सोयीसुविधा पुरविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मुंबईत अत्याधुनिक सोयीसुविधांनी सुसज्ज असा आंतरराष्ट्रीय दर्जाचा मासळी बाजार उभारण्यात येणार आहे.

अंधेरी पूर्व पर्यावरणपूरक इमारत मासळी बाजारात सर्वांत मोठी समस्या असते ती माशांचे उरलेले तुकडे आणि कचऱ्याची. या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी 'एआय'ची मदत घेण्यात येणार असून, भूमिगत कचराकुंड्या आणि स्मार्ट सेन्सर आदींचा वापर करण्यात येणार आहे.

विजेबाबत इमारत स्वयंपूर्ण असावी यासाठी सौरऊर्जा पॅनलचा अंतर्भावही इमारतीत करण्यात येणार आहे.

आंतरराष्ट्रीय विमानतळापासून अवघ्या दोन किलोमीटरवर ही जागा असून मेट्रो स्थानकही येथून जवळ आहे. या बाजाराची इमारत पर्यावरणपूरक असेल ज्यात कमीत कमी कचऱ्याची निर्मिती होणार आहे.

या सुविधाचा समावेश

सुक्या माशांचा बाजार

संग्रहालय

कोल्ड स्टोरेज

कोळी भवन

समाज सभागृह रेस्टॉरन्ट

प्रशिक्षण केंद्र

70 वाहनांसाठी पार्किंग


हेही वाचा

295 बेकरींना पालिका कारणे दाखवा नोटीस बजावणार

6 फूटाची गणेशमूर्ती कृत्रिम तलावात विसर्जित करा: आयुक्त सौरभ राव

पुढील बातमी
इतर बातम्या