बिल्डरांच्या बांधकामामुळे फुटपाथची दुरवस्था

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

सुभाषनगर - चेंबूरच्या सुभाषनगर परिसरात एका खासगी बिल्डरांमार्फत याठिकाणी एसआरए प्रकल्प सुरु आहे. वर्षभरापासून हा प्रकल्प या ठिकाणी सुरु आहे. मात्र काही झोपड्या महिना भरापूर्वी तोडण्यात आल्या आहेत. त्यानंतर या ठिकाणी पत्रे लावण्याचे काम करण्यात आलं. येथील झोपड्या तोडत असताना जेसीबी मशीनमुळे येथील फुटपाथ देखील तोडण्यात आल्याने पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालावे लागत आहे. त्यामुळे पालिकेने अशा बिल्डरांवर कडक कारवाई करावी अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या