महागाईने कंबरडे मोडले! प्रतिलिटर दुधाच्या दरात मोठी वाढ

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईकरांच्या खिशावर आता अतिरिक्त ताण पडणार आहे. कारण रोज लागणारे दूध हे महागले आहे. मंगळवार मध्यरात्रीपासून मुंबईतील म्हशीच्या दुधाच्या घाऊक दरात प्रति लिटर 5 रुपयांनी वाढ झाली आहे. यामुळे कच्चा माल म्हणून त्यावर अवलंबून असलेल्या संपूर्ण खाद्य उद्योगावर लक्षणीय परिणाम होऊ शकतो. (milk price increased) 

मुंबई दूध उत्पादक संघाने (एमएमपीए) गेल्या शुक्रवारी म्हशीच्या दुधाच्या घाऊक दरात मोठी वाढ जाहीर केली होती. एमएमपीएच्या कार्यकारी समितीचे सदस्य सीके सिंग म्हणाले- घाऊक दुधाच्या किमती 80 रुपये प्रति लिटरवरून 85 रुपये प्रति लीटरपर्यंत वाढतील आणि 31 ऑगस्टपर्यंत लागू राहतील.

यानंतर मुंबईतील 3,000 हून अधिक किरकोळ विक्रेत्यांकडून मलईदार ताज्या म्हशीच्या दुधाच्या किरकोळ बाजारात वाढ केली जाईल. जे आता 1 मार्चपासून प्रति लिटर 85 रुपयांवरुन सुमारे 90 रुपये प्रति लिटर मिळेल.

सर्वसामान्य ग्राहकांना या वाढीव दरवाढीचा फटका मोठ्या प्रमाणात बसणार आहे. कारण दुधासोबतच इतर दुग्धजन्य पदार्थ देखील महागतील. MMPA कोषाध्यक्ष अब्दुल जब्बार चावनीवाला म्हणाले- याचा परिणाम रेस्टॉरंट्स, फुटपाथ विक्रेते किंवा छोट्या हॉटेल्समध्ये दिल्या जाणाऱ्या चहा-कॉफी-मिल्कशेक इत्यादींच्या दरांवर देखील होईल.

खवा, पनीर, पेडा, बर्फी सारख्या मिठाई, काही उत्तर भारतीय किंवा बंगाली मिठाई यांसारख्या दुग्धजन्य पदार्थांच्या किमतीत आता वाढ होऊ शकते. उत्तर मुंबईचे मुख्य दूध उत्पादक महेश तिवारी यांनी सांगितले की, काही सण आणि लग्नसराईच्या पूर्वसंध्येला ही दरवाढ झाली आहे. त्याचा परिणाम बुधवारपासून घाऊक दुधाच्या दरात वाढ झाल्यामुळे होणार आहे.


हेही वाचा

महाराष्ट्रात यंदा उन्हाचा तडाखा वाढणार, मागील रेकॉर्ड मोडणार

पुढील बातमी
इतर बातम्या