बस स्टॉपवर फेरीवाल्याचं अतिक्रमण

  • श्रद्धा चव्हाण & मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

गोरेगाव - गोरेगाव पश्चिमच्या भगतसिंहनगर बस स्टॉपच्या फुटपाथवर फेरीवाल्यांनी अतिक्रमण केलं आहे. सकाळ, संध्याकाळ या बस स्टॉपच्या बाजूला भाजीवाले, मासे विक्रेते बसतात. त्यामुळे इथून प्रवास करणाऱ्यांना याचा त्रास होतो. बस स्टॉपजवळच फेरीवाल्यांची गर्दी असते, त्यामुळे चालणं कठीण होत असल्याचा आरोप प्रवाशी निरंजन शेट्टी यांनी केला आहे. तर, या अतिक्रमणावर लवकरच कारवाई करू असं आश्वासन पालिका सहाय्यक आयुक्त अशोक कुमार धोडें यांनी दिलं आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या