सीएसएमटी स्थानकावरील आंदोलकांवर गुन्हा दाखल

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंब्रा (mumbra) दुर्घटनेला जबाबदार असलेल्या दोन अभियंत्यांवर दाखल केलेला गुन्हा मागे घ्यावा यासाठी सेंट्रल रेल्वे मजदूर संघाच्या (CRMS) कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (csmt) येथे गेल्या आठवड्यात आंदोलन केले.

यामुळे लोकल सेवा तब्बल एक तास विस्कळीत झाली. या प्रकरणी सीएसएमटी पोलिसांनी रात्री आंदोलकांवर गुन्हा दाखल केला.

जून महिन्यात मुंब्रा येथे झालेल्या दुर्घटनेत पाच प्रवाशांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी मध्य रेल्वेचे वरिष्ठ विभागीय अभियंता समर यादव आणि सहाय्यक विभागीय अभियंता विशाल डोळस यांच्याविरोधात ठाणे रेल्वे पोलिसांनी गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

हे गुन्हे मागे घेण्यासाठी सेंट्रल रेल्वे मजदूर संघाने गुरुवारी सीएसएमटी स्थानकात आंदोलन केले. यामुळे सुमारे एक तास लोकल सेवा ठप्प झाली होती.

संघटनेला डीआरएम कार्यालयासमोर आंदोलन करण्यास परवानगी असताना सीआरएमएसचे पदाधिकारी व सदस्य जमाव मिलन हॉल येथे जमा झाले.

जमावामध्ये सीआरएमएस संघटनेचे प्रमुख प्रविण वाजपेयी व त्यांच्या सोबत इतर 100 ते 200 आंदोलक (protesters) हे सामील होते.

आंदोलक डीआरएम कार्यालयासमोर गेले व तेथे रेल्वे पोलीस ठाणे, लोहमार्ग मुंबई (mumbai) यांच्याकडून करण्यात आलेल्या कायदेशीर कारवाईचा निषेध करून घोषणाबाजी केली.

आंदोलन समाप्त झाल्यानंतर सीआरएमएस संघटनेचे सदस्य एस. के. दुबे आणि विवेक शिसोदीया व त्यांच्यासोबत इतर 30 ते 40 आंदोलक हे सीएसएमटी लोकल लाईन जनरल हॉल येथील मोटरमन लॉबी येथे आले.


हेही वाचा

कसारा, कर्जतपर्यंत 15 डब्ब्यांची लोकल धावणार

ठाणे-नवी मुंबई-भाईंदर दरम्यान पॉड टॅक्सी धावणार

पुढील बातमी
इतर बातम्या