मुंबई (mumbai) लोकलच्या मोटरमन केबिनसमोर होणाऱ्या अपघातांचे योग्य कारण आणि विश्लेषणासाठी केबिनबाहेर सीसीटीव्ही कार्यान्वित करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे.
मध्य रेल्वेच्या (central railway) ताफ्यातील निम्म्या लोकलच्या केबिनबाहेर सीसीटीव्ही कार्यान्वित करण्यात आले आहे. तर उर्वरित केबिनबाहेर सीसीटीव्ही बसवण्याचे काम सुरू आहे.
रेल्वे माहिती अधिकार कार्यकर्ते समीर झवेरी यांनी लोकलच्या (local) मोटरमन केबिनबाहेरील सीसीटीव्ही लावण्याच्या प्रकल्पाची माहिती मध्य रेल्वेकडे मागवली. त्यानुसार ही माहिती समोर आली आहे.
रेल्वे रुळांवर आत्महत्या, रुळांवरील अडथळे आणि लोकलचा समोरून अपघात झाल्यावर त्याचे ठोस कारण समोर येण्यासाठी केवळ मोटरमनचा जबाब आणि प्रत्यक्षदर्शींचा जबाब हेच पर्याय असतात.
अनेकदा यात तफावत आढळून येते. यामुळे पुराव्यानिशी ठोस कारण समजण्यासाठी लोकलच्या केबिनबाहेर रेल्वे रुळ आणि परिसराचा वेध घेणारे उच्च दर्जाचे सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.
मध्य रेल्वेच्या ताफ्यात 15 डब्यांच्या 162 आणि 15 डब्यांच्या दोन अशा एकूण 164 लोकल गाड्या आहेत. यापैकी 161 मोटरमन केबिन बाहेर सीसीटीव्ही बसवण्यात आले आहे. तसेच ते कार्यान्वित आहेत.
163 मोटरमन केबिनबाहेर कॅमेरे (camera) बसवण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशी बाब माहिती अधिकारातून समोर आली आहे. सीसीटीव्ही फुटेजमुळे अपघातानंतर चौकशी अधिक पारदर्शक आणि अचूक होणार आहे.
मोटरमनची चूक आहे की बाह्य कारणामुळे अपघात घडला, रुळांवर कोणता अडथळा होता का, सिग्नल किंवा अन्य तांत्रिक बिघाड होता का, याबाबत ठोस पुरावे उपलब्ध होणार आहेत.
त्यामुळे चुकीच्या आरोपांपासून मोटरमनचे संरक्षण होण्यास मदत होणार आहे. दरम्यान, याआधी अनेकदा लोकल ट्रेन मार्गावर अपघाताचे प्रकार समोर आले आहेत.
रेल्वे ट्रॅकवर आत्महत्या करुन एखाद्याचा मृत्यू होणं, किंवा लोकलच्या धडकेत मृत्यू किंवा गाडी रुळावरुन घसरणं.
यासारख्या कोणत्याही कारणामुळे लोकलचा अपघात झाल्यास योग्य ती खरी माहिती मिळावी, मोटरमन कोणत्याही पुराव्याशिवाय दोषी ठरू नये याचसाठी हे सीसीटीव्ही (CCTV) बसवण्याचं महत्त्वाचं पाऊल रेल्वेकडून उचलण्यात आलं आहे.
हेही वाचा