छबीलदास शाळेतही सुरु होणार इंग्रजी वर्ग

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

दादर - दादरमधील ऐतिहासिक शारदाश्रम, बालमोहन यांच्याच पंक्तीत छबीलदास शाळेचं देखील नाव समाविष्ट करावं लागेल. छबीलदास शाळेला नुकतीच 127 वर्षे पूर्ण झाली. छबीलदास म्हटली की, डोळ्यासमोर येतात ती मराठी नाटकं आणि मराठी संस्कृती जपणारी शाळा. पण आता छबीलदास शाळेत सीबीएससी बोर्डाच्या अभ्यासक्रमाची सुरूवात करण्यात आलीये. पुढील वर्षी प्री प्रायमरी इंग्रजी माध्यम शाळाही या अभ्यासक्रमावर आधारीत सुरु करण्यात येणार आहे.

हल्ली मराठी शाळांमध्ये आपल्या मुलांना घालायला पालक निरूत्साही असतात. आता इंग्रजी माध्यमातून आपला मुलगा शिकला तर पुढे भविष्यात त्याचा फायदा होईल. त्यामुळे मराठी माध्यम बंद न करता इंग्रजी माध्यम सुरू करण्याचा निर्णय घेतल्याचे छबीलदास शाळेचे विश्वस्त अरविंद पार्सेकर यांनी सांगितले. सीबीएससी बोर्डासाठी लागणाऱ्या सगळ्या अटी शाळेने पूर्ण केल्यामुळे शाळेला सीबीएससी बोर्ड सुरू करण्याची परवानगी मिळाली. सीबीएससी बोर्डासाठी अपेक्षित वर्ग तयार करण्याचे काम सध्या शाळेत सुरू आहे. त्यामुळे लवकरच छबीलदास शाळेचे रूप पालटलेले बघायला मिळणार आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या