JVLR मार्गावरील वाहतुकीत 'या' तारखेपर्यंत बदल

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

साकीनाका वाहतूक विभागाच्या हद्दीतील जेव्हीएलआर मार्गावर रामबाग ब्रिज आणि एनटीपीसी जंक्शन येथे मेट्रो 6 प्रकल्पाचे एका खाजगी कंपनीकडून मेट्रो स्टेशन उभारणीसाठी काम करणात येत आहे. त्यामुळे  या कामासाठी  4 ते 31 मे दरम्यान दररोज रात्री 1 ते 6 वाजेपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात हा मार्ग बंद करण्यात आला आहे. 

'हा' रस्ता वाहतुकीसाठी बंद

  • जेव्हीएलआर रोड वरील गणेश घाट ते रामबाग रामबाग ब्रिज उतरणी पर्यंत उत्तर वाहिनीवरील वाहतूक सर्व प्रकारच्या वाहनांकरीता बंद राहील.
  • जेव्हीएलआर रोड वरील पवई प्लाझा ते एनटीपीसी जंक्शन पर्यंतची दक्षिण वाहिनीवरील वाहतूक सर्व प्रकारच्या वाहनांकरीता बंद राहील.

पर्यायी मार्ग

  • जेव्हीएलआर रोड रामबाग ब्रिज उत्तर वाहिनीवरील वाहतूक ही दक्षिण याहिनीने वळविण्यात येईल. तसेच ब्रिजच्या दक्षिण वाहिनी वरील वाहतूक हि सेवा मार्गाने वळविण्यात येईल.
  • जेव्हीएलआर रोड पवई प्लाझा ते एनटीपीसी जंक्शन दरम्यानची दक्षिण वाहिनीवरील वाहतूक ही उत्तर वाहिनीने वळविण्यात येईल.


हेही वाचा

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे केबल ब्रिज मार्च 2025 पर्यंत सुरू होणार

मेट्रो लवकरच बीकेसीऐवजी वरळीपर्यंत धावणार

पुढील बातमी
इतर बातम्या