'राईट टू एम्पाॅवर' सायकल रॅलीसाठी वाहतूक मार्गात बदल

  • मुंबई लाइव्ह टीम & सूरज सावंत
  • सिविक

मुंबईत बिर्ला एज्युकेशन ट्रस्टतर्फे रविवारी सकाळी ६.३० ते १०.३० पर्यंत 'राईट टू एम्पाॅवर' सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडीची समस्या उद्भवू शकते. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी वाहतूक मार्गांमध्ये बदल केले आहेत. या रॅली निमित्ताने बदल करण्यात आलेल्या मार्गांवर वाहने पार्किंगसाठी उभी करता येणार नाहीत.

रॅली कुठून कुठे?

मरिन ड्राइव्हच्या एअर इंडिया इथून सुरू होणारी ही रॅली मफतलाल जंक्शन बाबुलनाथ मार्ग, आरटीआय जंक्शन, कॅडबरी जंक्शनमार्गे, अॅनी बेजंट मार्ग येथून बिंधू माधव चौक वरळी येथे जाणार आहे. बिंधू माधव चौकातून पुढे ही रॅली लोटस जंक्शन इथून लाला लजपतराय मार्ग, हाजीअली जंक्शन, पेडर रोड, आरटीआय जंक्शन विल्सन काॅलेज मार्गे पारसी जिमखाना इथं समाप्त होणार आहे.

पार्किंगची व्यवस्था कुठे?

त्यामुळे रॅलीच्या मार्गावर सकाळी ५ ते १० वाजेपर्यंत पार्किंग प्रतिबंधीत करण्यात आले आहे. या भागातील नागरिकांची गैरसोय होऊ नये. यासाठी एन.एस.रोड, बी.डी.रोड, खान अब्दूल गफार खान, या मार्गांवर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.

राखीव मार्गिका

सायकल रॅलीकरता बीडीमार्ग, एमएस मार्ग ते वरळी सीलिंक गेट आणि पेडर रोडमार्गे वरळी सीलिंक ते पारसी जिमखाना या मार्गांवर सायकल रॅलीकरिता राखीव मार्गिका ठेवण्यात आल्या आहेत.

पुढील बातमी
इतर बातम्या