कपात करूनही महाराष्ट्रात पेट्रोल, डिझेलचे दर चढेच

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

केंद्र सरकारपाठोपाठ राज्यातील महाविकास आघाडी सरकारनंही रविवारी इंधनात करकपात केली. राज्य सरकारने पेट्रोलवरील मूल्यवर्धित करात 2 रुपये 08 पैसे, तर डिझेलवरील करात 1 रुपया 44 पैसे कपात केली़. सोमवारपासून हे नवे दर लागू करण्यात आले आहेत.

केंद्र सरकारने पेट्रोलवरील अबकारी करात 8 रुपये तर डिझेलवरील करात सहा रुपये कपात शनिवारी केली होती. राज्य सरकारांनीही मूल्यवर्धित करात कपात करावी, अशी सूचना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली होती. पेट्रोल 111.35 प्रति लिटर तर डिझेलची किंमत 97.28 प्रति लीटर आहे.

त्यानुसार राज्य सरकारने हे पाऊल उचलल़े इंधनावरील मूल्यवर्धित करात कपात करण्यात आल्याने महाराष्ट्राच्या तिजोरीवर सुमारे 2500 कोटींचा वार्षिक बोजा पडणार आहे.

नागरिकांना दिलासा दिला़ सध्या राज्यात पेट्रोलच्या लिटरमागील दरात राज्याचा कर हा ३२ रुपये ५५ पैसे होता. त्यात आता 2 रुपये 08 पैसे कपात होईल. डिझेलवर 22 रुपये 37 पैसे हा राज्याचा कर होता. त्यात 1 रुपया 44 पैसे कपात करण्यात आली आहे.

केंद्राने गेल्या नोव्हेंबरमध्ये इंधनावरील अबकारी करात वाढ केली होती. आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे दर वाढत असताना करवाढ केल्याने टीका झाली होती. नागरिकांना त्याचा फटका बसू नये, यासाठी केंद्राने राज्यांना मूल्यवर्धित करात कपात करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार भाजपशासित राज्यांनी इंधनाच्या दरात कपात केली होती.


हेही वाचा

ई-बाईक अपघात टाळण्यासाठी परिवहन विभागाचे पुढचे पावले

पुढील बातमी
इतर बातम्या