२५ ऑक्टोबरपासून व्यायामशाळा, फिटनेस सेंटर उघडणार

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात अनलॉक अंतर्गत बऱ्याच गोष्टी टप्प्याटप्प्याने सुरु केल्या जात आहे. मात्र, गेल्या सात महिन्यांपासून राज्यातील व्यायामशाळा आणि फिटनेस सेंटर बंद होते. यामुळे मागच्या महिन्याभरापासून राज्यामध्ये जिम, व्यायामशाळा सुरु करण्याची मागणी जोर धरला होता. राज्य सरकारने आज अखेर ही मागणी मान्य केली असून राज्यात येत्या २५ ऑक्टोबरपासून व्यायामशाळा आणि फिटनेस सेंटर उघडण्याची परवानगी दिली आहे. तसेच कोरोनाच्या वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपायोजना आणि नियमांचे काटेकोरपणे पालन करुन, राज्यात जिम, फिटनेस सेंटर, व्यायामशाळा सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

हेही वाचाः-कंगनाविरोधात एफआयआर दाखल करा; मुंबई पोलिसांना कोर्टाचे आदेश

आरोग्य विभाग, वैद्यकीय तज्ज्ञ आणि जिम, फिटनेस सेंटर्स, व्यायामशाळांचे चालक यांनी तयार केलेल्या ‘एसओपी’चे पालन करूनच दसऱ्यापासून जिम, फिटनेस सेंटर्स आणि व्यायामशाळा सुरू करता येणार आहेत. हे नियम तपशीलाने आणि नेमकेपणाने तयार करण्यात आले आहेत. त्यामध्ये व्यायामासाठी येणाऱ्या सदस्यांना या ‘एसओपी’ची पूर्णपणे माहिती देणे अपेक्षीत आहे. व्यायाम शाळेच्या वेळा, तसेच मर्यादित संख्येत प्रवेश देणे. प्रशिक्षक, अन्य व्यवस्थापकीय अधिकारी यांची वारंवार आरोग्य तपासणी तसेच स्वच्छतेच्या बाबी यासाठी तपशीलाने नियमावली तयार करण्यात आली आहे. व्यायामशाळेत प्रवेश करण्यापासून ते व्यायाम करताना कोण-कोणती काळजी घ्यावे याचे नियम आहेत. शारिरीक अंतर, हातांची स्वच्छता आणि मास्क वापरणे या नियमित गोष्टी बरोबरच, क्षेत्रफळांनुसार जास्तीत जास्त सुरक्षित शारिरिक अंतर राखणे. व्यायामशाळेचे दर तासाला निर्जंतुकीकरण करणे. उपकरणांमध्ये अंतर ठेवणे, वापरानंतर त्यांचे निर्जंतुकीकरण करणे. दररोज रात्री जिम, व्यायामशाळा बंद झाल्यानंतर पुर्णपणे निर्जंतुकीकरण करावे लागणार आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या