Chinese App Ban : TikTok, Helo सह ५९ चायनीज मोबाईल अॅपवर बंदी

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीनं धोकादायक ठरण्याची शक्यता असलेली ५९ चायनीज (Chinese App Ban) मोबाईल अॅपवर (Chinese mobile app) बंदी घालण्यात आली आहे. मोदी सरकारनं (modi government) भारताच्या सार्वभौमत्व आणि एकात्मतेला धोका पोहोचू नये म्हणून हा निर्णय घेतला आहे. TikTok आणि Helo या लोकप्रिय अॅप्सचा (Mobile apps) यात समावेश आहे.

देशाच्या माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयानं कलम 69 A च्या अंतर्गत ही बंदी घातली आहे. चीनकडून सायबर अटॅकची भीती गेले काही दिवस व्यक्त करण्यात येत होती. त्यावर उपाय म्हणून या चिनी अॅप्सवर बंधनं नव्हे तर बंदीच (Chinese App Ban) घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

देशवासीयांची सायबर स्पेस सुरक्षित राहावी, यासाठी हा निर्णय घेत असल्याचं सांगण्यात आलं आहे. या ५९ अॅप्सवर बंदी घालण्यात आली आहे. त्याचबरोबर मोबाईल अॅप्स आणि इंटरनेट वापरताना कोणती काळजी घ्यावी, डाऊनलोड करताना कुठली माहिती द्यावी याबाबत भारत सरकारनं निवेदन जारी केलं आहे.

सरकारनं या ५९ अॅप्सची यादीसुद्धा जाहीर केली आहे. हे अॅप्स डाऊनलोड करू नये, असा इशारा देण्यात आला आहे.

बंद अॅप्सची यादी

TikTok

Shareit

Kwai

UC Browser

Baidu map

Shein

Clash of Kings

DU battery saver

Helo

Likee

YouCam makeup

Mi Community

CM Browers

Virus Cleaner

APUS Browser

ROMWE

Club Factory

Newsdog

Beutry Plus

WeChat

UC News

QQ Mail

Weibo

Xender

QQ Music

QQ Newsfeed

Bigo Live


पुढील बातमी
इतर बातम्या