महाराष्ट्राचे (maharashtra) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत दिलेल्या निवेदनात सिडको (cidco) घरांबाबत घोषणा केली आहे.
नवी मुंबईतील विविध श्रेणीतील घरांसाठी (House) सिडकोने ठरवलेल्या दरांमध्ये (Rate) 10 टक्के कपात करण्यात येत आहे.
या निर्णयामुळे ही घरे स्वस्त दरात उपलब्ध होतील. यामुळे नवी मुंबई परिसरात सामान्य माणसाला घर घेणे सोपे होईल.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी सांगितले की, सिडकोने नवी मुंबईतील (navi mumbai) खारघर, वाशी, खारकोपर, तळोजा, उलवे, कळंबोली, कामोठे आणि पनवेल भागात अंदाजे 17,000 घरे बांधली आहेत.
या घरांसाठी लॉटरी प्रक्रिया पुढील दोन महिन्यांत पूर्ण होईल. त्यांनी पुढे सांगितले की, सामान्य माणसाला दिलासा देण्यासाठी घरांच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
EWS आणि LIG श्रेणीतील घरांच्या किमती 10 टक्क्यांनी कमी केल्या जातील.
याबद्दल बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सर्वांसाठी घरे या संकल्पनेला बळकटी देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
यामुळे सामान्य नागरिकांना परवडणाऱ्या किंमतीत चांगल्या दर्जाची घरे उपलब्ध होतील.