असले कसले मुंबईतले फुटपाथ !

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबई - मुंबईतले फुटपाथ चालण्यायोग्य नसल्याची टीका अनेकांनी आजवर केलीय. तसे पुरावेही अनेकदा समोर आलेत. मात्र आता खुद्द पालिका आयुक्तांनीच फुटपाथची दुरवस्था झाल्याचं मान्य केलंय. माझ्या पालकांना या फुटपाथवरून चालायचं असलं तरी मी त्यांना पाठवण्याचं धाडस करू शकत नसल्याची कबुलीच पालिका आयुक्त अजॉय मेहता यांनी दिलीय. यावरच मुंबई लाईव्हनं मुंबईतल्या फुटपाथचा रिअॅलिटी चेक केलाय. काही फुटपाथ कचरापेटी बनलेत, काहींवर पार्किंग असल्याचही मुंबई लाईव्हन केलेल्या रिअॅलिटी चेकमध्ये पाहायला मिळालंय. त्यामुळे पालिका आयुक्तांनी स्वत:च्या पालकांना मुंबईतल्या फुटपाथवर उतरवण्याची भीती वाटतं असल्याचं वक्तव्य केलं असलं तरी प्रत्यक्षातली स्थिती मात्र त्याहूनच गंभीर आहे. फक्त वयोवृद्ध नागरिकच नाही तर सामान्य धडधाकट मुंबईकरांनाही या फुटपाथवरून चालणं कठीणच झालंय. त्यामुळे फुटपाथ लवकरात लवकर दुरूस्त करण्याचं आश्वासन जरी पालिका आयुक्त अजॉय मेहता यांनी दिलं असलं, तरी त्याची योग्यरीतीने अंमलबजावणी झाली की नाही हे पाहणारा रिअॅलिटी चेक पून्हा ‘मुंबई लाईव्ह’ करणार आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या