कापड विक्री संघटनेचा आंदोलनाचा इशारा

  • भूषण शिंदे & मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुलुंड - मुलुंड पूर्वच्या इस्टर्न एक्स्प्रेस हायवेपासून गव्हाणपाडा येथून मुलुंडमध्ये प्रवेश करण्यासाठी आणखी एक मार्ग तयार करण्यात येणार असल्याचं आश्वासन भाजपाचं खासदार किरीट सोमय्या यांनी दिलं आहे. त्यामुळे या मार्गावर कापड विक्रीचा व्यवसाय करणाऱ्यांच्या पोटावर पाय येण्याची शक्यता आहे. कापड विक्रेत्यांसाठी ही जागा भाजपाचे आमदार तारासिंग यांनी उपलब्ध करुन दिली होती. मात्र आता त्यांना महामार्गाशेजारी स्थलांतर करण्यात आलं आहे. त्यामुळे त्यांनी या गोष्टीला विरोध दर्शवत आंदोलन करण्याचा इशारा दिलाय. हे कापड विक्रेते बोहारणींकडून जुने कपडे घेऊन थोडी दुरुस्ती करून या बाजारात विकत असत. यामुळे या कापड विक्रेत्यांनी कायमस्वरूपी जागेची मागणी केली आहे. 'गरीब कापड विक्रेत्यांना सरकार हक्काची जागा देणार नसेल, तर आम्ही तीव्र आंदोलन करू' असा इशाराही कापड विक्रेता संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत भोसले यांनी या वेळी दिला आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या