महानगरपालिकांमधील कर्मचाऱ्यांचीही बदली होणार?

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

महानगरपालिकांतील अधिकारी, कर्मचाऱ्यांची अन्य महानगरपालिकेत बदली करण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक आहे. यासाठी अधिनियमात आवश्यक सुधारणा करण्याबाबत बदल करण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानपरिषदेत दिली.

महापालिकेतील कर्मचाऱ्यांची बदली इतरत्र करता येत नसल्याने वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी राहून गैरकामांना गती मिळत असते, अशी लक्षवेधी सूचना सदस्य गिरीशचंद्र व्यास यांनी मांडली होती.

महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांची इतर ठिकाणी बदली करावयाची असल्यास महापालिकेच्या नियमात आणि कायद्यांमध्ये दुरुस्ती करणे आवश्यक आहे. त्यासाठी आवश्यक तो प्रस्ताव तयार करण्यात येईल. वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत राहून गैरकारभार करणाऱ्या कर्मचाऱ्यांची बदली त्याच विभागातील दुसऱ्या महानगरपालिकेत करण्याबाबतची प्रक्रिया तपासण्यात येऊन आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल. त्यामुळे महापालिकेमध्ये भ्रष्टाचार कमी करता येईल अशी आशा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

पुढील बातमी
इतर बातम्या