उद्धव ठाकरेंनी केली कोस्टल रोडची पाहणी

  • संतोष मोरे & मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

गिरगाव चौपाटी - मुंब्ईतील वाहतूकीची कोंडी फोडण्यासाठी मुंबईकरांनी जे स्वप्न पाहिल होतं ते कोस्टल रोडच स्वप्न पूर्ण होतयं. या कोस्टल रोडची शनिवारी पहिली पाहणी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार अनिल देसाई, मुंबई शहर पालक मंत्री सुभाष देसाई, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे, महापालिका आयुक्त अजोय मेहता उपस्थित होते. समुद्राच्या तळाला लागलेले दगड हे कोस्टल रोडच्या टनेलच्या कामासाठी अत्यंत योग्य असल्याची प्रतिक्रीया या वेळी उद्धव ठाकरे यांनी दिली. तसंच याची टेंडर प्रकियाही सुरू झालीयं. मुंबईकराना समाधानाच जीवन द्यायला आम्ही बांधील आहोत. मुंबईकर ज्या प्रकल्पाची वाटत पाहत होते, त्या कोस्टल रोड प्रकल्पाला मंजूरी मिळाली असल्याची माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली. आंतरराष्ट्रीय कंपन्या कोस्टल रोडच्या कामासाठी प्रयत्नात आहेत. प्रकल्पासाठी १४ हजार कोटी रूपये अंदाजे खर्च येणार आहे. तसंच टेंडर प्रकिया मार्च २०१७ पूर्ण होईल. प्रिन्सेस स्ट्रीट ते वांद्रे सी लिंकपर्यंत पहिला टप्पा २०१९ ला पूर्ण होईल. वांद्रे ते कांदिवली सी लिंक असा दुसरा टप्पा आहे. अहमदाबादपर्यंत तिसरा टप्पा प्रस्तावित आहे. तर नेव्ही, कोस्टगार्ड, मेरीटाईम बोर्ड, राज्यपर्यावरण खात्याची परवानगी मिळाली आहे. केंद्रिय पर्यावरण खात्याची परवानगी मिळणे बाकी आहे, ती लवकरच मिळेल अशी माहिती महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी दिली.

पुढील बातमी
इतर बातम्या