आयुक्तांनी बोलावली तातडीची स्थायी समितीची बैठक

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबई - पालिका स्थायी समितीच्या मंगळवारी पार पडलेल्या बैठकीत विकास कामांचे शंभर प्रस्ताव मंजूर करण्यात आल्यानंतर गुरुवारी पुन्हा तातडीची बैठक प्रस्ताव मंजूर करण्यासाठी बोलावण्यात आली. पण ही सभा स्थायी समिती अध्यक्षांनी न बोलावता थेट आयुक्त अजोय मेहता यांनी बोलावली. महापालिका रुग्णालय आणि प्रसूतिगृह तसेच दवाखाने यामध्ये ऑक्सिजन आणि ऑक्सीइड यांची खरेदी करण्यासाठी तसेच उद्यान, मैदान, वाहतूक बेट यांच्या देखभालीचे दोन महत्त्वाचे प्रस्ताव पटलापुढे ठेवण्यात आले आहेत. स्थायी समितीची बैठक ही आठवड्याला एकदा घेण्यात येते. परंतु मंगळवारी झालेल्या बैठकीत तहकूब आणि सर्वच प्रस्ताव मंजूर करण्यात आले. त्यामुळे एकही प्रस्ताव शिल्लक नसल्यामुळे तहकूब बैठक बोलावता येत नसल्यामुळे महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी महापालिका अधिनियम 1888 च्या कलम 49 (सी) अंतर्गत बैठक बोलावण्याची सूचना स्थायी समिती अध्यक्षांना केली. त्यानुसार तातडीची बैठक बोलावण्यात आली. सध्या दोन प्रस्ताव पटलावर घेण्यात येत असून, यामाध्यमातून आयुक्तांनी अन्य काही प्रस्ताव पटलावर घेण्यासाठी महापालिका चिटणीस खात्याकडे पाठवले आहे. त्यामुळे हे प्रस्ताव पटलावर घेण्याची कार्यवाही रात्री उशिरापर्यंत सुरु होती.

पुढील बातमी
इतर बातम्या