मुंबईत आता रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत सर्व सार्वजनिक बांधकाम बंद असतील, मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी तसे निर्देश दिले आहेत.
बांधकामाच्या ठिकाणांवर वेळेचे बंधन न पाळल्यामुळे स्थानिक नागरिकांना होणाऱ्या त्रासाबद्दल पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी बुधवारी बांधकाम व्यावसायिक संघटनेची बैठक घेतली. त्यात रात्री १० वाजल्यापासून सकाळी ६ वाजेपर्यंत काम पूर्णपणे बंद ठेवणे, आवाजाच्या नियमांचे पालन करणे व बांधकाम ठिकाणांवर नियमांचे फलक लावणे आदी सूचना बांधकाम व्यावसायिकांनी मान्य केल्या.
या बैठकीला बांधकाम क्षेत्रातील १५ प्रतिनिधी उपस्थित होते. सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंतच काम करावे, बांधकाम ठिकाणांवर आवाज प्रितबंधित शीट्स लावणे, ६५ डेसिबलपेक्षा अधिक आवाज होणार नाही, याची दक्षता घेणे, सुरक्षा रक्षकांचा गणवेश पोलिसांसारखा नसावा, सुरक्षा रक्षकांनी मुख्य रस्त्यावर काम करू नये, कामाच्या ठिकाणी फलक लावून कामाच्या नियमांबाबत माहिती देणे याबाबत सूचना करण्यात आल्या. त्या सर्वानी मान्य केल्या आहेत.