एका उंदरामुळे मिळाली १९ हजारांची नुकसान भरपाई

  • मुंबई लाइव्ह टीम & निलेश अहिरे
  • सिविक

एरवी रस्त्यावरून किंवा अस्वच्छ परिसरातून जाता-येताना आपल्या नजरेला उंदीर-घुशी सहजपणे दिसून येतात. पण मुंबई-एर्नाकुलम दुरंतो एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या एका महिलेला चक्क बोगीत उंदीर दिसल्याने तिने एकच गोंधळ घातला. एवढ्यावरच न थांबता या महिलेने थेट ग्राहक न्यायालयात धाव घेतली. तिथं झालेल्या सुनावणीनुसार न्यायालयाने रेल्वे प्रशासनाला दोषी धरत प्रवासी महिलेला १९ हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला.

नेमकं प्रकरण काय?

हे प्रकरण २०१५ सालातील आहे. पेशाने वकील असलेल्या शीतल कनाकिया आणि त्यांची नातेवाईक हेमा कनाकिया मुंबई-एर्नाकुलम दुरंतो एक्स्प्रेसमधून प्रवास करत असताना त्यांना त्यांच्या बोगीत एक उंदीर दिसला. या प्रकरणी त्यांनी एक्स्प्रेसमध्ये आलेल्या तिकीट तपासणीस यांच्याकडे लिखित तक्रार नोंदवली आणि नियोजीत स्थानकावर उतरल्यानंतर रेल्वे प्रशासनाकडेही तक्रार नोंदवली.

<iframe src="https://www.facebook.com/plugins/post.php?href=https%3A%2F%2Fwww.facebook.com%2Fpermalink.php%3Fstory_fbid%3D2021934591183176%26id%3D100000999643786&width=500" width="500" height="645" style="border:none;overflow:hidden" scrolling="no" frameborder="0" allowTransparency="true" allow="encrypted-media"></iframe>

रेल्वेकडून टाळाटाळ

त्यावर ट्रेनमध्ये उंदीर दिसणं हे सामान्य गोष्ट असल्याचं उत्तर त्यांना मिळालं. रेल्वे कर्मचाऱ्यांना ट्रेनच्या साफसफाईसाठी केवळ ३ दिवस मिळतात. त्यामुळे ट्रेनचा प्रत्येक कोपरा साफ होईलचं हे सांगता येत नाही, असं म्हणत रेल्वे प्रशासनाने त्यांच्या तक्रारीकडे साफ दुर्लक्ष केलं.

ग्राहक न्यायालयाकडे धाव

त्यामुळे या महिला प्रवाशाने सर्व पुरावे जमा करत थेट ग्राहक न्यायालयात धाव घेतली. तिथं झालेल्या सुनावणीत न्यायालयाने रेल्वे प्रशासनाच्या गलथान कारभारावर बोट ठेवत महिलेला १९ हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्याचा आदेश रेल्वे प्रशासनाला दिला.


हेही वाचा-

गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेच्या विशेष गाड्या

मध्य रेल्वेचे लोको पायलट उपोषणावर


पुढील बातमी
इतर बातम्या