कोरोनाने मृत पावलेल्या 10 जणांचे मृतदेह अंत्यविधीविना पडून, भाजप नेत्याचा गंभीर आरोप

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक
मुंबईत कोरोना बाधित रुग्ण आणि मृतांची वाढती संख्या ही चिंताजनक आहे. या महामारीने मृत पावलेल्यांवर तातडीने अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना असताना ही कोरोनाने मृत पावलेल्या 10 मृतदेहांवर अंत्यसंस्कार केलेले नसल्याचा आरोप भाजप नेते प्रभाकर शिंदे यांनी केला आहे. हे 10 मृतदेह परळच्या केईएम रुग्णालयात असल्याचे सांगितले जाते.

मुंबईत कोरोनाने मृत पावलेल्या व्यक्तीवर केवळ भोईवाडा विद्युतदाहिनीमध्ये अंत्यसंस्कार करण्याचे निर्देश महापालिकेने दिले आहेत. त्यामुळे शहरातील विविध ठिकाणाहून कोरोनाने मृत पावलेले मृतदेह अंत्यविधीसाठी या स्मशानभूमित येत असल्यामुळे मृतदेहांच्या विल्हेवाटीस विलंब होत आहे. यात कोरोनामुळे मृत होणाऱ्या संशयित रुग्णांचा देखील यात  समावेश आहे. असे संशयित रुग्ण, त्यांचा नाक व घसा यातून स्वॅबद्वारे घेतलेल्या नमुन्यांचे अहवाल येण्यापूर्वीच मृत झाले आहेत. कोरोनाचा अधिक संसर्ग टाळण्यासाठी अशा सर्व मृतदेहांची तातडीने विल्हेवाट लावणे गरजेचं आहे. माञ तसे होताना दिसत नसल्याचा आरोप शिंदे यांनी केला आहे.

या बाबत शिंदे यांनी पालिका आयुक्तांना पञ लिहून कोरोनाने मृत पावलेल्यांवर शहरातील इतर विद्युतदाहिनीत असलेल्या स्मशानभूमित ही अंत्यसंस्काराला परवानगी देण्याची मागणी शिंदे यांनी केली आहे. केईएम रुग्णालयात स्वॅबव्दारे घेतलेल्या नमुन्यांचा अहवाल येण्यापूर्वीच मृत पावलेल्या सुमारे 10 संशयित कोरोनाबाधित रुग्णांचे मृतदेह अंत्यविधीविना पडून आहेत. ते अत्यंत धोकादायक असल्याचे प्रभाकर शिंदे यांनी पञात म्हटलं आहे.
पुढील बातमी
इतर बातम्या