मुंबईतील दारूची दुकाने बंद, महापालिका आयुक्तांनी एका रात्रीत काढला आदेश

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक
मुंबईत दारूच्या खरेदीसाठी वाईनशाँपबाहेर नागरिकांच्या लांबच लांब लागलेल्या रांगा पाहून सोशल डिस्टंसिंगचा पूरता फज्जा उडाल्याचे मुंबईत ठिकठिकाणी पहायला मिळले. मुंबईत कोरोनाचा वाढता कहर, त्यात दारूच्या दुकानांबाहेर होणारी वाढती गर्दी म्हणजे एका प्रकारे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यास होणारी मदतच, म्हणूनच की काय पालिका आयुक्त प्रवीण परदेशींनी राज्याने दिलेल्या परवानगीनंतर अवघ्या दुसऱ्याच दिवशी मुंबईतील दारूच्या दुकानांवर निर्बंध घातलेले आहेत.

मुंबईत मंगळवारी कोरोनाचे 635 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर दिवसभरात 26 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोना या महामारीने आतापर्यंत 387 जणांचा मृत्यू झाला आहे. पालिका आणि प्रशासनाकडून या महामारीवर नियंञण मिळवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू असताना. दुसरीकडे राज्याचा आर्थिक गाडा ही संभाळणे गरजेचे आहे. म्हणूनच राज्यसरकारने कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असलेल्या ठिकाणा दारू विक्रीला  अटी व शर्तीच्या आधारे परवानगी दिली. ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच तळीरामांनी राञीपासूनच वाईनशाँप बाहेर रांगा लावत सोशल डिस्टंसिंगचा नियम धाब्यावर बसले. अवघ्या 2 दिवसात 62.55 कोटींची दारू विक्री झाली आहे. ही गर्दी इतकी वाढली की, पोलिसांना गर्दीवर नियंञण मिळवणे ही कठीण होऊन बसले.ही बाब गांभीर्याने घेत पालिका आयुक्तांनी कठोर पाऊल उचलले आहे.

पालिका आयुक्तांनी रात्री उशिरा एक आदेश काढून उद्यापासून मुंबईत जीवनावश्यक वस्तू व औषधांची दुकाने सोडून अन्य अनावश्यक वस्तूंची दुकाने उघडण्यास मनाई असेल, असे स्पष्ट केले आहे. एका प्रभागात अशी केवळ पाच दुकाने उघडण्यास परवानगी होती. त्या आदेशानुसार दारूची दुकाने उघडली होती. मात्र हा आदेश तातडीने रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे उद्यापासून मुंबईत पूर्वीच्या आदेशाप्रमाणे केवळ जीवनावश्यक वस्तूंची दुकाने व औषध दुकानेच उघडी राहणार आहेत. आदेशाची संपूर्ण मुंबईत काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी. आदेशाचे उल्लंघन केल्यास त्यावर कलम 188 अन्वये कठोर कारवाई करण्यात यावी, असेही नमूद करण्यात आले आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या