राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा १ लाखांच्या वर

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक
राज्यात शुक्रवारी कोरोनाचे नवे ३४९३ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या १ लाख १ हजार १४१ इतकी झाली आहे.  शुक्रवारी १७१८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर १२७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात ४६ हजार ६१६ रुग्ण हे अॅक्टिव्ह आहेत.

 मुंबईत  ९०, ठाण्यात ११, कल्याण-डोंबिवलीत ३, वसई-विरार, मिरा-भायंदर, धुळे आणि अमरावतीत प्रत्येकी एक, नाशिक आणि औरंगाबादमध्ये प्रत्येकी दोन, सांगलीत ३ आणि पुण्यात १२ रुग्ण दगावले आहेत.  

१२७ मृत्यूंपैकी ६० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाचे ६७ रुग्ण होते. तर ५२ रुग्णांचे वय हे ४० ते ५९ या वयोगटातील होते. ४० वर्षांखालील ८ रुग्ण होते. १२७ पैकी ८९ रुग्णांमध्ये मधुमेह, उच्चरक्तदाब, हृदयरोग असे जोखमीचे आजार होते. राज्यात मृत्यूंची ३७१७ इतकी झाली आहे. 


पुढील बातमी
इतर बातम्या