Coronavirus Update: धारावीत ३४ नवे कोरोनाग्रस्त, एकूण संख्या २७५वर

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईत कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. यामध्ये आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या मुंबईतील धारावी परिसरात कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला आहे. रविवारी दिवसभरात धारावीत ३४ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळं कोरोनाग्रस्तांची संख्या २७५वर गेली आहे.

धारावीत आतापर्यंत कोरोनामुळं १४ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, धारावीत रविवारी सापडलेल्या ३४ नव्या रुग्णांमध्ये १९ पुरुष तर १५ महिला आहेत. त्यामुळं एकूण रुग्णांचा आकडा २७५वर पोहोचला आहे.

पेंशन चाळ, सोशल नगर, कुंचीकोर्वे नगर, मुकुंद नगर, इंदिरा नगर, न्यू म्युनिसिपल चाळ, माटुंगा लेबर कॅम्प, विजय नगर, राजीव गांधी चाळ, आकाशवाडी धारावी क्रॉस रोड, जनता सोसायटी, राजीव गांधी नगर, आसरा इस्टेट, पीएमजीपी कॉलनी, उदय सोसायटी, शताब्दी नगर, सिद्धी चौक, धारावी, कुंभारवाडा, धारावी पोलीस ठाणे, शिवशक्ती नगर, मुस्लिम नगर, शाहू नगर, अजनेरा स्ट्रीट, कमला नेहरू नगर, ढोरवाडा, मंगलवाडी, शास्त्री नगर परिसर आदी भागांत रुग्ण सापडले आहेत.

पुढील बातमी
इतर बातम्या