Coronavirus Updates: मुंबईत १५ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

कोरोना व्हायरसचा हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबईत सोमवारी दिवसभरात १५ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तसंच, ३९५ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या आता ५ हजार ५८९ वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत एकूण २१९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात सर्वाधिक कोरोना रुग्ण हे मुंबईत आहेत. दिवसागणिक कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. दिवसभरात कोरोनाचे ३९५ नवे रुग्ण सापडले आहेत. तर १५ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता ५५८९ झाली आहे. तर मत्यूचा आकडा २१९ वर पोहोचला आहे.

सोमवारी दिवसभरात ११८ जण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आलं आहे. आतापर्यंत १०१५ रुग्णांना पूर्णपणे बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, धारावीत कमी कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. सोमवारी दिवसभरात १३ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यात ८ पुरुष आणि ५ महिला आहेत. धारावीतील एकूण रुग्णसंख्या २८८ झाली आहे. तसंच, आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू झाला आहे. दादर आणि माहिममध्ये सलग तिसऱ्या दिवशी एकही कोरोनाबाधित सापडला नाही.

पुढील बातमी
इतर बातम्या