कोरोनामुळं एसटीच्या २ कर्मचाऱ्यांचा मृत्य

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना वाहतूक सेवा देण्यासाठी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी जीव धोक्यात घालून आपलं कार्य बजावत आहेत. असं असलं तरी कोरोनानं एसटीच्या कर्मचाऱ्यांना टार्गेट केलं आहे. एसटीच्या ६६ कर्मचाऱ्यांना करोनाची लागण होऊन  दोन जणांचा मृत्यू झाला आहे. याबाबत एसटीच्या झालेल्या आढावा बैठकीत माहिती देण्यात आली.

परिवहनमंत्री अनिल परब यांनी ही आढावा बैठक घेतली. मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना ५० लाख रुपयांचं अनुदान देण्यात येणार आहे. मृत्यू झालेल्यांत जळगावमधील एका चालकाचा समावेश आहे. तर, दुसरा कर्मचारी बुलडाणा लेखा विभागातील असून तो मात्र कर्तव्यावर नव्हता. कर्मचाऱ्यांवर उपचारासाठी एसटीकडून अधिकारी नेमला जाणार आहे. 

कोरोना झालेल्यांत मुंबई, ठाणे, पनवेल विभागातील सर्वाधिक कर्मचारी असून त्याखालोखाल जळगाव, बुलडाणा आणि अन्य विभागांतील आहेत. दरम्यान, लॉकडाऊनच्या काळात एसटीनं आपली हद्द पार करत परराज्यातील नागरिकांना वाहतूक सेवा दिली. तसंच, सद्यस्थितीत एसटी महामंडळानं बसफेऱ्यामध्ये वाढ केली आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या