Coronavirus Updates : बेस्टचे कर्मचारी आरोग्य विभागावर नाराज

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

लॉकडाऊनच्या काळात मोठ्या संख्येनं बेस्टचे वाहक आणि चालक आपली सेवा देत आहेत. परंतुस या कर्मचाऱ्यांना कोरोनानं घेरलं आहे. बेस्टच्या कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे बेस्टच्या कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण आहे. मात्र या परिस्थितीत बेस्टचा आरोग्य विभाग काहीच मदत करत नसल्याचं कर्मचाऱ्यांचे म्हणणं आहे. बेस्टमध्ये ३ मे रोजी ३६ कर्मचारी बाधित होते. तर गेल्या २०-२५ दिवसांत ही संख्या २२० वर गेली आहे. यापैकी ७० टक्के कर्मचारी हे परिवहन विभागातील आहेत.  

बेस्टचा उपक्रमाचा आरोग्य विभाग असून त्यात २७ डॉक्टर आहेत. मात्र या आरोग्य विभागाकडून पुरेशी आरोग्य सेवा मिळत नसल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. बेस्टचे जे २०० कर्मचारी बाधित झाले आहेत, त्यातील प्रत्येकाला आरोग्य विभागाकडून दररोज तीन वेळा दूरध्वनी करून त्यांच्या आरोग्याचा पाठपुरावा केला जात आहे. 

या सर्व रुग्णांना त्यांच्या त्यांच्या विभागात रुग्णालयात खाटा, अतिदक्षता विभागात खाटा मिळवून देण्यासाठी आरोग्य विभागाने प्रयत्न केले आहेत. आतापर्यंत २० हजार कर्मचाऱ्यांच्या तपासण्या करण्यात आल्या असून जीवनसत्त्वाच्या दहा हजार गोळ्या वाटण्यात आल्या आहेत.

पुढील बातमी
इतर बातम्या