मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. शनिवारी राज्यात कोरोनाचे २२३ जणांचा बळी गेल्याची नोंद करण्यात आली आहे. तर मुंबईत शनिवारी दिवसभरात १३०८ नवीन रुग्ण आढळल्याने कोरोनाशी दोन हात करणाऱ्या अत्यावश्यक सेवांवरील भार दिवसेंदिवस वाढतच आहे. मुंबईत गुरूवारी दिवसभरात ३९ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनाबाधीत रुग्णांमध्ये मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे.
मागील दिवसांपासून मुंबईत कोरोनाचा मृत्यूदर दिवसेंदिवस वाढत आहे. मृतांच्या एकूण संख्येत शनिवारी भर पडली आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत कोरोनाचे ३९ रुग्ण दगावले आहेत. तर ६ जुलै रोजी ३९ मृत व्यक्तींची नोंद झाली आहे. त्या पूर्वी ५ जुलै रोजी एकूण ६९ जण या आजाराला बळी पडल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे. या शिवाय, शनिवारी मुंबईत कोरोनाचे १३०८ नवीन रुग्ण आढळले आहेत. मुंबईत रुग्णांची एकूण संख्या आता ९१ हजार ४७५ इतकी झाली आहे. तर शनिवारी दिवसभरात १ हजार ४९७ जणांनी कोरोनावर मात केली असून कोरोनाची लागण झालेल्या एकूण ६३ हजार ४३१ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. त्यामुळं मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.
राज्यात आज ४३६० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.५५ टक्के असून आतापर्यत एकूण संख्या १ लाख ३६ हजार ९८५ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ८१३९ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ९९ हजार २०२ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १२ लाख ८५ हजार ९९१ नमुन्यांपैकी २ लाख ४६ हजार ६०० नमुने पॉझिटिव्ह (१९.१७ टक्के) आले आहेत. राज्यात ६ लाख ८० हजार १७ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४७ हजार ३७६ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज २२३ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ४.१ टक्के एवढा आहे.