Coronavirus Update : जिमखान्यांचा वापर क्वारंटाईन केंद्र म्हणून

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईत कोरोनाव्हायरसच्या (Coronavirus Update) रुग्णांमध्ये वाढ होत आहे. रुग्णांची वाढती संख्या पाहता बृहन्मुंबई महानगरपालिकेनं (BMC) पीव्ही हिंदू जिमखाना आणि मरीन ड्राईव्ह इथले काही जिमखाने ताब्यात घेण्याचा निर्णय गेतला आहे. या जिमखान्यांमध्ये क्वारंटाईन केंद्र सुरू करण्यात येणार.

टीओआयच्या बातमीनुसार, पालिका मरीन ड्राईव्ह (पोलिस, कॅथोलिक, ग्रँड मेडिकल, हिंदू, इस्लाम आणि पारसी) मधील सर्व सहा जिमखान्यांचा ताबा घेणार आहे. सहसा, जिमखान्याचे मैदान खेळण्यासाठी वपारले जाते. पण सध्या लॉकडाऊन असल्यानं ते बंद आहेत. अशा परिस्थितीत या जिमखान्यांचा वापर COVID १९ च्या रुग्णांना क्वारंटाईन करम्यासाठी केला जाऊ शकतो.

पी. जे. हिंदू जिमखानाचे मानद सहसचिव प्रणव चिकल यांनी सी-वॉर्डचे सहाय्यक आयुक्त यांना सांगितलं की, गुरुवारपासून आम्ही त्यांना क्वारंटाईन केंद्र उभारण्यासाठी जागा दिली आहे.

इस्लाम जिमखानाचे अध्यक्ष आणि माजी आमदार युसूफ अब्राणी यांनी टीओआयला सांगितलं की, काही दिवसांपूर्वी पालिका अधिकाऱ्यांनी इस्लाम जिमखानाची पाहणी केली होती. आम्ही हा जिमखाना देण्यासाठी तयारी देखील दर्शवली. शिवाय पालिकेला जिमखान्याच्या परिसरात क्वारंटाईन केंद्र उभारण्यास परवानगी देणारा आमचा पहिला जिमखाना आहे.


हेही वाचा

चिंताजनक! अवघ्या दोन दिवसात 50 जणांचा कोरोनाने मृत्यू, मुंबईत 748 नवे रुग्ण

महालक्ष्मी रेसकोर्स, विज्ञान केंद्र, निसर्गोद्यानात क्वारंटाईन सेंटर उभारणार

पुढील बातमी
इतर बातम्या