कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. असं असलं तरी एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांचा आकडा दीड लाखांवर पोहोचला आहे. गेल्या २४ तासांत १,५१,७४० रुग्ण बरे झाले आहेत. देशात गेल्या २४ तासांत २,५८,०८९ नवे कोरोनाबाधित सापडले आहेत. कालच्यापेक्षा हा आकडा १३,११३ रुग्णांनी कमी आहे. तर ३८५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांचा आकडा दीड लाखांवर पोहोचला आहे. गेल्या २४ तासांत १,५१,७४० रुग्ण बरे झाले आहेत. देशात सध्या १६,५६,३४१ रुग्ण उपचार घेत आहेत. दिवसाचा पॉझिटिव्हीटी रेट ११९.६५ टक्क्यांवर गेला आहे. तर ओमायक्रॉन रुग्णांचा आकडा ८,२०९ वर गेला आहे.
भारतात कोरोना लसीचे १५७.२० कोटी डोस देण्यात आले आहेत. चाचणीबद्दल बोलायचे झाल्यास, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR) नुसार, भारतात काल म्हणजेच रविवारपर्यंत १३,१३,४४४ चाचण्या करण्यात आल्या, कालपर्यंत एकूण ७०,३७,६२,२८२ चाचण्या करण्यात आल्या आहेत.
गेल्या आठवड्यात मुंबईत २० हजारांच्या घरात असलेला दैनंदिन रुग्णवाढीची संख्या रविवारी ८ हजारांवर आली आहे. गेल्या २४ तासात रुग्ण निदानाच्या तुलनेत कोविडमुक्त होणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. शिवाय, सक्रिय रुग्णांचे प्रमाण कमी होत असल्यानं यंत्रणांसह मुंबईकरांसाठी ही दिलासादायक बाब आहे.