वादळानंतर पालिकेच्या कर्मचाऱ्यांवरील ताण वाढला, नगरसेवकांनं लढवली 'ही' शक्कल

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

चक्रीवादळ "तौंते"मुळे मुंबई आणि आसपासच्या भागात बरीच झाडे पडली. यामुळे लोकांना मोठा त्रास सहन करावा लागला आहे. मुंबईतील बहुतेक प्रत्येक प्रभागात झाडं पडल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे पालिका कर्मचार्‍यांवर सध्या झाडे काढण्यासाठी प्रचंड दबाव येत आहे.

पालिकेमध्ये मनुष्यबळ, साहित्य आणि संसाधनं अशा बऱ्याच गोष्टींचा दबाव आहे. याची दखल घेत प्रभाग क्रमांक १ चे नगरसेवक तेजस्वी घोषाळकर यांनी स्वत:च्या निधीतून खासगी कंत्राटदार, जेसीबी आणि इतर उपकरणे, ट्रक, मनुष्यबळ यासह रस्त्यावर झाडे तोडण्याची व्यवस्था केली आहे.

माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर म्हणाले की, "आमची टीम आमच्या प्रभागातील वेगवेगळ्या भागात काम करीत आहे. पडलेली झाडं गोळा करून त्यांना जैन गार्डनजवळील रस्त्याच्या टोकावर हलवत आहोत. त्याबाबत पालिकेला माहिती दिली आहे आणि नंतर तिथून ते दुसरीकडे नेले जातील. अनेक झाडं तोडली गेली आहेत. त्यामुळे काम पूर्ण करण्यास ३ ते ४ दिवस लागतील."

सर्व परिस्थिती लक्षात घेऊन तेजस्वी घोसाळकर हे काम करत आहेत. पडलेल्या फांद्या आणि झाडे उचलण्याचं काम ते त्याच्या वैयक्तिक निधीतून समाजासाठी करत आहेत.


पुढील बातमी
इतर बातम्या