सर्वाधिक ऑमिक्रॉन रुग्ण मोठ्या शहरांत; देशात कोरोनाची तिसरी लाट

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

कोरोनाची तिसरी लाट आलेली असताना देशात नोंदवण्यात आलेली सर्वाधिक ऑमिक्रॉन प्रकरणं मोठ्या शहरांमधील असल्याचं देशाच्या लस टास्क फोर्सच्या प्रमुखांनी स्पष्ट केलं आहे. शिवाय देशात कोरोनाची तिसरी लाट जवळपास आली असल्याचंही त्यांनी म्हटलं.

नोव्हेंबर महिन्यात सर्वात प्रथम दक्षिण आफ्रिकेत ऑमिक्रॉनचा रुग्ण आढळला होता. त्यानंतर वेगाने संसर्ग होणाऱ्या ऑमिक्रॉनच्या रुग्णांमधील ७५ टक्के रुग्ण मुंबई, दिल्ली आणि कोलकाता अशा मोठ्या शहरांमधील असल्याची माहिती समोर येत आहे.

जिनोम सिक्वेन्सनुसार व्हेरियंटकडे पाहिलंत तर डिसेंबर महिन्यातील पहिल्या आठवड्यात पहिल्या व्हायरसची नोंद झाली. गेल्या आठवड्यात देशात एकूण १२ ऑमिक्रॉनचे रुग्ण सापडले असून ते आता २८ टक्क्यांवर पोहोचले आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे.

यात महत्वाचं म्हणजे मुंबई, कोलकाता आणि खासकरुन दिल्ली अशा मोठ्या शहरांमधील रुग्णसंख्या जास्त असून ७५ टक्क्यांहून अधिक आहे.

भारतात आतापर्यंत १७०० ऑमिक्रॉन रुग्णांची नोंद झाली असून यामधील सर्वाधिक महाराष्ट्रात असून ५१० रुग्ण आढळले आहेत. यासोबत देशातील कोरोना रुग्णसंख्येत २२ टक्क्यांची वाढ पहायला मिळाली आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या