महापरिनिर्वाण दिनानिमित्त विशेष लोकल फेऱ्या

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त (Mahaparinirvan Divas 2025) प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने (central railway) विशेष लोकल सेवा सुरू केल्या आहेत.

मध्य रेल्वे (CR) 5 आणि 6 डिसेंबरच्या मध्यरात्री (शुक्रवार-शनिवार मध्यरात्री) परळ-कल्याण आणि कुर्ला-पनवेल स्थानकांदरम्यान 12 अतिरिक्त उपनगरीय विशेष गाड्या (mumbai local train) चालवणार आहे.

तपशील खालीलप्रमाणे आहेत:

कुर्ला-परळ विशेष लोकल कुर्ला येथून 00.45 वाजता सुटेल आणि परळ येथे 01.05 वाजता पोहोचेल.

कल्याण-परळ विशेष लोकल कल्याण येथून 01.00 वाजता सुटेल आणि परळ येथे 02.20 वाजता पोहोचेल.

ठाणे-परळ विशेष लोकल ठाणे येथून 01.10 वाजता सुटेल आणि परळ येथे 02.55 वाजता पोहोचेल.

परेल-ठाणे विशेष लोकल परळ येथून 01.15 वाजता सुटेल आणि ठाणे येथे 01.55 वाजता पोहोचेल.

परेल-कल्याण विशेष लोकल परळ येथून 02.30 वाजता सुटेल आणि कल्याण येथे 03.50 वाजता पोहोचेल.

परेल-कुर्ला विशेष लोकल परळ येथून 03.05 वाजता सुटतील आणि कुर्ला येथे 03.20 वाजता पोहोचेल.

वाशी-कुर्ला विशेष लोकल वाशी येथून 01.30 वाजता सुटेल आणि कुर्ला येथे 02.10 वाजता पोहोचेल.

पनवेल-कुर्ला विशेष लोकल 01.40 वाजता सुटेल आणि कुर्ला येथे 02.45 वाजता पोहोचेल.

वाशी-कुर्ला विशेष लोकल वाशीहून 03.10 वाजता सुटेल आणि कुर्ल्याला 03.40 वाजता पोहोचेल.

कुर्ला-वाशी विशेष लोकल कुर्ल्याहून 02.30 वाजता सुटेल आणि वाशीला 03.00 वाजता पोहोचेल.

कुर्ला-पनवेल विशेष लोकल कुर्ल्याहून 03.00 वाजता सुटेल आणि 04.00 वाजता पनवेलला पोहोचेल.

कुर्ला-वाशी विशेष लोकल कुर्ल्याहून 04.00 वाजता सुटेल आणि 04.35 वाजता वाशीला पोहोचेल.

रेल्वे प्रशासन प्रवाशांना गैरसोय टाळण्यासाठी योग्यरितीने तिकिटे घेऊन प्रवास करण्याचे आवाहन करत आहे.


हेही वाचा

दक्षिण मुंबई ते ठाणे प्रवास फक्त 25 मिनिटांत

निवडणुकीपूर्वी मुंबई महापालिकेकडे 45,000 ईव्हीएम युनिट

पुढील बातमी
इतर बातम्या